लाल किल्ला समोरचे प्रांगण सजवायला सुरवात झाली. पुण्याहून ट्रक भरून तोफा, ढाली, मशाली, कलाकारांचे कपडे आणि रंगमंच सांभाळणारी चमू. किल्ला समोर डास आणि रस्त्यावरील कुत्र्यांशी सामना करीत राजांचे मावळे दिवस रात्र एक करत कामाला लागले.पाच मजली फिरता रंगमंच, शहाजहानने बांधलेल्या लाल किल्ल्याच्या तटबंदीला देखील थोडी लाज वाटावी अशी रंगमंचाची उंची. उत्तम नेपथ्य, नवीनतम लाइटिंग सिस्टीम अन त्याला साजेशी साउंड सिस्टीम-ध्वनी व्यवस्था सहा हजारा पेक्षा अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय- दूर दूर हुन येणा-या प्रेक्षकांसाठी खास अल्पोपहाराचे स्टॉल्स.
जो लोग इसे सिर्फ एक महानाट्य के रूप मे देख रहे है वो एक भारी भूल कर रहे है. यह प्रयोग ऐसा एक ऐतिहासिक अनुष्ठान है जिसमे दर्शक भी इतिहास जिने और मेहसूस करने को विवश हो जाता है. इसे सिर्फ एक नाटक ना मानने क और एक कारण है की ये सिर्फ संवादो की अदायगी या पात्रो का इधर उधर जाना, या सेट की भव्यता, या फिर घोडे और उंट जैसे प्राणीयो का अचंभित कर देने वाला प्रवेश नही है. ये शिवाजी राजा के साथ जुडावं भी है वर लगाव भी है.राजा शिवछत्रपती महनाट्य देखने के बाद शिवाजी के चरित्र की उस विराटता के दर्शन होते है जिसमे एक पराक्रमी योद्धा, एक कुशल रणनीतिकार, एक अद्वितिय प्रशासक और एक मजबुत मातृ भक्त चरित्रवान व्यक्तित्व का समावेश है.राजा शिवछत्रपती हमे उस हिंदवी स्वराज के रचनाकार के दर्शन कराता है. जो ना रुकता है, ना झुकता है और न ही बिकता है.' स्वतः एक प्रसिद्ध लेखक आणि रंगभूमीचे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद जोशींनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलेलं मनोगत
दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्राचा गेल्या काही वर्षापासून कायापालट झाला आहे. डॉ. जोशी यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर एलिटिस्ट बनलेल्या या केंद्रामध्ये सर्वसामान्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु झाली आहे. विविध विषयांवर चर्चा, शास्त्रीय गायनाच्या मैफिली, चित्र प्रदर्शने आदी. जाणता राजाच्या दिल्लीत पहिल्यांदा होणाऱ्या प्रयोगानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेले वरील टिपण म्हणूनच महत्वाचे!
आश्चर्याची बाब म्हणजे राजांच्या जन्मापासून तर त्यांच्या बलाढ्य मोगलांशी लढाया व राज्याभिषेक पर्यंतचा रंजक इतिहास अडीच तासात अतिशय रोचक पध्धतीने गुंफणा-या आणि लंडन व अमेरिका सहित १००० पेक्षा जास्त प्रयोग झालेल्या या महानाट्याचा दिल्लीत एकही प्रयोग झाला नव्हता. म्हणायला नव्वदीत एका पंचतारांकित हॉटेलच्या मोठ्या सभागृहात एक प्रयोग झाला होता पण ते एक छोटेखानी व्हर्जन.
दिल्लीत हा प्रयोग व्हायलाच हवा. शिवाजी महाराजांच्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिवशाहीर पुरंदरे काही दिवस राजधानीत मुक्कामाला होते. चर्चा झाल्या. जाणता राजा सादर करणा- या शिवसृष्टी प्रतिष्ठानशी संपर्क झाला. दिल्लीत प्रयोग करायचाच.
राजधानीतील वजनदार मंडळींनी पुढाकार घेतला. महानाट्यासाठी निधी सुद्धा मोठा हवा. मोठी नावे-मोठा निधी आणि त्यासाठी लागणारे प्रायोजकही... या प्रमाणात जाहिराती हव्यात, बॅनर्स, पोस्टर्स. व्ही.आय.पी. आणि व्ही.व्ही.आय.पी. मंडळींसाठी खास बसायची सोय, सोफासेटस, पासेस. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी. खास फेटे, शिवाजी राजांचे चित्र असलेले टी शर्टस घालून स्वागत करायला सज्ज असलेली कार्यकर्त्यांची फळी, राजधानीत राजांचे स्वागत त्यांना साजेसे व्हायला हवे.
पण उत्तर भारतीयांना शिवाजी राजे माहित आहेत का? जाणता राजाचा उच्चार दिल्लीकर मंडळी जनता राजा तर नाही करणार? दिल्ली आणि राजांचा तर ऐतिहासिक संबंध... कित्येक राजे, महाराजे, सम्राट आले अन गेले. सल्ला मसलत झाली. प्रयोगाचे नाव बदलावे. जाणता राजाचं नवं बारसं झालं 'राजा श्री शिवछत्रपती ऐतिहासिक गौरव गाथा. लांबलचक नाव. पण नाव बदललं. जाणता राजाच्या १००० व्या प्रयोगात पहिल्यांदा नाव दुसरं दिलं गेलं. याआधी अगदी लंडन आणि न्यूयॉर्क येथील प्रयोग सुद्धा एकाच नावाने झाले पण दिल्लीसाठी नाव बदललं गेलं. दिल्लीकरांचे लाड! बैठकी झाल्या. दिल्लीकरांच्या मनात इतिहासाची थोडी तरी उजळणी व्हायला हवी.सध्या फॅड झालेल्या आणि बहुतांशी स्मार्ट फोनधारकांचा लाडका व्हाटसअॅप नावाच्या अॅपचा उपयोग करून घ्यायचं ठरलं. दिल्लीकरांचं आणि इतिहासाचं तसं वैर. अगदी मुगलांनी बांधलेल्या भल्या थोरल्या हवेल्यांपासून तर जवाहरलाल नेहरू ज्या घरातून कमला हक्सरला ज्या हक्सर हवेलीतून लग्नानंतर वरातीत घेऊन गेले ती हक्सर हवेली पर्यंत सगळयाचीच पूर्ण तोडफोड, पूर्ण विटंबना (हक्सर हवेली साठी दिल्ली उच्च न्यायालयाने ताकीद दिली की ती हवेली तोडली जाऊनये).
मराठी आणि हिंदीतून व्हाटसअॅप ग्रुप वर छोटे-छोटे मेसेजेस पाठवणे सुरु झाले. आपल्याला हे माहित आहे का, की ज्या भागाला आज चावरी बाजार म्हणतात तिथे मराठा सरदार महादजी शिंदे चावडी वर बसत आणि मुघल बादशाहला सूचनावजा आदेश देत?
वगैरे वगैरे.मेसेजेस नंतर पोस्टर्स अँड व्हिडीओ. इच्छा ही की दिल्लीकर जनतेला शिवाजी राजेंबद्दल माहिती व्हायला हवी.
लाल किल्ला समोरचे प्रांगण सजवायला सुरवात झाली. पुण्याहून ट्रक भरून तोफा, ढाली, मशाली, कलाकारांचे कपडे आणि रंगमंच सांभाळणारी चमू.किल्ला समोर डास आणि रस्त्यावरील _ कुत्र्यांशी सामना करीत राजांचे मावळे दिवस रात्र एक करत कामाला लागले.पाच मजली फिरता रंगमंच, शहाजहानने बांधलेल्या लाल किल्ल्याच्या तटबंदीला देखील थोडी लाज वाटावी अशी रंगमंचाची उंची. उत्तम नेपथ्य, नवीनतम लाइटिंग सिस्टीम अन त्याला साजेशी साउंड सिस्टीम-ध्वनी व्यवस्था.सहा हजारा पेक्षा अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोयदूर दूर हुन येणा-या प्रेक्षकांसाठी खास अल्पोपहाराचे स्टॉल्स.
तारीख ठरली... ६ ते १० एप्रिल २०१८. पण दिल्लीसारख्याच लहरीपणाने आलेल्या पावसामुळे आणि धुळीच्या वादळान पहिला प्रयोग रद्द करावा लागला- पण उत्साही कार्यकर्ते म्हणाले, "निसर्गाने स्वतः राजांना केला मानाचा मुजरा!"
प्रत्येक दिवशी पहिल्या रांगेत प्रतिष्ठित मंडळी-मंत्री, उच्पदस्थ अधिकारी, सुप्रीम कोर्टापासून इतर न्यायालयांचे न्यायमूर्ती, लष्करासह तिन्ही सैन्यदलांचे बडे अधिकारी आवर्जून येत होते. खरं तर महाराष्ट्रातील तरुण मुलामुलींना देखील शिवाजी राजेंबद्दल किती माहिती असेल? छत्रपती शिवाजी म्हटलं तर पाहिलं नाव औरंगजेबाचं नंतर आण्याहून सुटका, अफझलखानाचा वध आणि लाल महालात त्यांनी शाहिस्तेखानाची कापलेली बोटे... आमच्या इतिहासात महाराजांबद्दल एवढ्याच गोष्टी ठळक!
दीड-दोन महिन्यात अक्षरशः इतिहासात राहणा-या (दिल्ली जगतातील फार कमी शहरांपैकी एक जिथे किमान हजारेक वर्षांपासून सतत मानवी वस्ती आहे) या शहराला राजांची ओळख करून देणं? जणू मुघलांना टक्कर देण्याइतकंच कठीण !
अडीच-तीन तासाचा प्रयोग पाहून काय दिल्लीकर राजांना थोडे तरी ओळखू, समजू शकतील का?
प्रयोगाच्या एक आठवड्या आधी एका सत्कार समारंभात बाबासाहेब पुरंदरे कळवळून म्हणाले होते, शिवाजी राजाला आपण फक्त शिवजयंती आणि पुण्यतिथीला हार घालून चालणार नाहीशिवसृष्टी प्रतिष्ठाणचे महासचिव डॉ.अजित आपटे म्हणाले स्थानिक कलाकारांचा महानाट्यामध्ये सहभाग आम्ही महत्वाचा भाग मानतो. त्यानिमित्ताने त्यांना या राजाबद्दल माहिती मिळते आणि ती त्यांच्या ध्यानात देखील राहते.
पुण्याहून आलेल्या कलाकारांना दिल्ली शहराने आपल्या खास पद्धतीने वागणूक दिली! कमीत कमी दोन कलाकारांचे मोबाईल फोन चोरी गेले. चांदणी चौकात त्यांना राहण्यासाठी दिलेल्या हॉटेलमध्ये त्यांना वारंवार होण्या-या वीज खंडित प्रवाहाचा सामना करावा लागला. रंगमंचा जवळ स्वच्छतागृहांची मारामार, कपडे बदलायची सोय देखील अपुरी.शेवटपर्यंत मशाली पेटवण्यासाठी लागणा-या घासलेट तेलाची कमी. पण प्रयोग झाले. यशस्वी झाले. तिकिट नसलेल्या या प्रयोगांना अक्षरशः हजारो दिल्लीवासीयांनी हजेरी लावली. अतिउत्साही कार्यकर्त्यांचा त्रासदेखील सहन केला. कमांडोंच्या गराड्यात येणा-या अतिमहत्वाच्या व्यक्तींमुळे होणारी गैरसोयपण सहन केली.
शिवाजी राजे आज असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती? 'ही वॉज ए फिलॉसॉफर किंग'... आपटे म्हणाले. राजांना स्वराज्यातून सुराज्य निर्माण करायचे होते. स्वराज्य आपण मिळवलं पण सुराज्यापासून आपण अजून फार लांब आहोत. आपटे बोलत होते. इतक्यात त्यांच्या मदतनिसाने येऊन सांगितले... सर, प्रयोगाची वेळ झालीय...