आज आंबे विकत घ्यायला बोरिवलीच्या फळबाजारात मी गेलो होतो. रसायनाची फवारणी करत असताना काढलेल्या व्हिडीओची आठवण होतीच.त्यामुळे द्विधा मनःस्थिती झाली होती.
पिकलेले हापूस बघितले. सुगंध अगदी कमी. त्यापेक्षा नैसर्गिकरित्या कितीतरी जास्त सुगंध असलेला पायरी बघितला. सुगंध नाही. आंब्यांनी खचाखच भरलेल्या बाजारात जराही सुगंध नाही. फक्त पिवळाधमक रंग.
शेवटी एका 'भैय्या' ला धीर करून विचारलं. म्हटलं, 'ये आम तो थोडा केमिकल लगाने के बिना पकताही नही होगा?' भैय्याने होकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, 'केले पकाने में जो केमिकल लगता है, वोही इसको लगाते है।' मी म्हटलं, 'पहले तो छोटा पॉकेट रखते थे।' भैय्या बोलला, 'हां.पर अब इस्प्रे मारते हैं। केमिकल के बिना आम पकताही नही। उसके बिना आम रखोगे तो सिर्फ आचार के लिये रह जाएगा।'
वा रे भैय्या. हा आम्हाला शिकवणार. मला लहानपणी कोकणात मामाकडे गेल्यावर एका खोलीत लावलेली अढी आठवली. झाडावर जून (काढण्यायोग्य) झालेले आंबे उतरवले की काहीही न करता ७ दिवसात पिकतात. पेंढ्यात ठेवले तर थोडे लवकर.
मग या केमिकल वापरावर प्रतिबंध का नाही? का आपण विषयुक्त आंबे खायचे? वर्षानुवर्षे हे असंच चालू राहणार का? महाराष्ट्राची आणि कोकणची शान असलेल्या आंब्यांचा या भैय्यांनी असा सत्यानाश का करायचा? कोकणातला शेतकरी कधी जागा होणार? तोही या पापात अप्रत्यक्षपणे सहभागी नाही का? ग्राहक हक्क संरक्षण संघटना काय करत आहेत? त्या केमिकल मुळे किती जण कॅन्सरला बळी पडत असतील, याची कल्पना आपण केलेय का?
मी महाराष्ट्राच्या FDA वर Ph.D. केली आहे. त्यांच्याकडे पुरेसे इन्स्पेक्टर नाहीत. जे आहेत त्यापैकी अनेक पैसे खातात. अनेकांवर कामाचा खूप ताणही आहे. कारण कोर्टातच शेकडो केसेस चालू आहेत. त्यामुळे FDA कडून कडक वगैरे कारवाई होईल अशी भोळी आशा कोणी बाळगू नये. त्याच बरोबर, आपण असंही बछनो की कोकणमाले आही शेतकारी आंब्याच्या झाडांवर कलरचा बपार बसान, तेहीथांबलं पाहिजे. आज नैसर्गिक शेनीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांचा आंबा शेत्क-यांनी स्वीकार कराण.
तेव्हा मला असं वाटतं की आपण हे करावं.
१. सगळ्यांचं प्रबोधन.त्याकरता हा लेख.
२. केमिकलने पिकवलेले आंबे खायचे नाहीत. ९९% आंबे केमिकलने पिकवलेले आहेत.एका वर्षी आंबे खाल्ले नाहीत तर काही बिघडत नाही.
३. आपण कोकणातून खात्रीलायक शेतक-यांना गाठून, त्यांच्याकडून आंबे खरेदी करूया. त्यांना चार पैसे जास्त मिळतील.नाहीतरी घाऊक व्यापारी शेतकऱ्यांना चांगली किंमत देतंच नाहीत.
४. काकणातल्या शेतकन्यांना हेही सांगू या, को त्यांनी कलर किंवाजत्सम रासायनिक कीटकनाशकांचा/यनांचावापरकरू. नैसर्गिक शनी आंगिकरावी.
५. FDA आणि सरकारवर दबाव आणावा. ग्राहक हक्क संरक्षण संस्थांनाही जाब विचारावा.
'विषयुक्त आंबे खाऊन तात्पुरता आनंद मिळवताना आपण कॅन्सरला तर आमंत्रण देत नाही ना, याचा गंभीर विचार झाला पाहिजे.