एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळयांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊलागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले, "अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो.'
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, "अहो, अरु नापास झालाय.'
ते म्हणाले, “मग होईल पुढच्या वर्षी पास!"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, "तो रडतोय"
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत
आले. मी म्हणालो, "या पुढे मी
इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व
गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही
व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत
नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश
झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं
करेल सुद्धा.
ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस? रडायचं असेल तर मी रडायला हवं! मी तर आनंदात आहे. तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यासइतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाहीमला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत? त्यातली किती पास झाली? मी म्हटलं मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील. त्यावर ते म्हणाले, १९ “पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू. पण तुयासारखे गाणे म्हणू शकतील असे किती ।
आहेत?' मी म्हणालो, "त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशारअभ्यासू विद्यार्थी आहेत.'
उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरी कडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊशकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील. पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
माझ्या मित्राला पैसे देज ते म्हणाले, "जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट. आमचा अरूण काय सुंदर गझल गायला लागलाय.तेव्हा मिठाई हवीच..
डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले, याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला?
मी त्याच क्षणी निश्चय केला. काहीही झालं तरी मी
इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा!
आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट!