जर तुम्ही लांबच्या ज प्रवासाला जाणार आहात आणि अचानक तुमची गाडी रद्द झाली तर तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला बराच खटाटोप करावा लागत होता. पण आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार गाडी रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांना धावपळ करण्याची गरज नाही. प्रवाशांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवीन नियमानुसार, गाडी रद्द होताच प्रवाशाचा पीएनआर (पैंसेजर नेम रिकर्ड) आपोआपच रद्द होणार आहे. तसेच ज्या खात्यातून तिकीट बुकींग करण्यात आली होती त्याच खात्यात तिकिटाचे पैसे जमा केले जातील. नवीन नियमांनुसार प्रवाशांना तात्काळ तिकीट बुकींगही वेगाने करता येणार आहे. यासाठी प्रवाशांना अँड्राईड मोबाईलमध्ये आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.ज्यामुळे प्रवासाच्या एक दिवस आधीही तिकीट बुक करता येणार आहे. यात एसी कोचच्या तिकीटांची बुकींग सकाळी वाजल्यापासून सुरू होईल तर सामान्य तिकीटासाठी वाजल्यापासून बुकींग सुरू होईल. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा गाडीला निघायला तीन तास उशीर झाला तर प्रवासी तात्काळ तिकीटासाठी दिलेली रक्कम परत मागू शकतात.
शकतात. प्रवासादरम्यान गाडीने आपला मार्ग बदलला व तुम्हाला त्या मार्गावरून जायचे नसेल तर तुम्ही संपूर्ण प्रवासाची रक्कम परत मागू शकता. जर काही कारणाने तुम्हाला प्रवास करणे शक्य नसेल तर तुमच्या तिकीटावर आई-वडिल, बहिण-भाऊ पत्नी व मुलं प्रवास करू शकतील.पण त्यासाठी गाडी सुटण्याच्या तास आधी तुम्हाला रेल्वेने दिलेल्या निर्देशानुसार रेल्वेला लेखी विनंती करावी लागेल.