मा आरोग्याव णसाच्या आयुष्यात सुख किंवा आनंद हे बहुतांशी त्याच्या उत्तम आरोग्यावरच अवलंबून असते आणि अशा उत्तम आरोग्यासाठी आहार-विहार (हिंडणे-फिरणे, व्यायाम) व निद्रा (झोप) या त्रयींची नितांत गरज असते. किंबहुना, आहार-विहाराला पोषक आणि पूरक निद्रा किंवा झोप असते.त्या दृष्टीने झोप हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली- आनंदाचा पासवर्ड आहे! झोपेमुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळून त्याला तरतरी येते. एक प्रकारची मनशांती लाभते.म्हणूनच निवांत झोप घेणे हे सर्वासाठीच उपयुक्त आहे. छोट बाळ जवळजवळ रात्रंदिवसझोप घेत असत, त्यामुळेच ते चांगले बाळस घेत घेत वाढत असते.
वृद्धांना हि झोप आवश्यकच असते.म्हणजे अगदी आबालवृद्धांना झोप हे एक उत्तम टनिकच आहे. खर तर यथेच्छ झोप कुणाला आवडणार नाही बरं? पण आपल्या रोजच्या धावपळीत पुरेशी झोप येणे शक्य होत नाही. विशेषतरू शिफ्टमध्ये काम करणारे कामगार विविध ठिकाणी रात्रपाळी करणारे, अन्य कर्मचारी, विविध विवंचनानी त्रस्त झालेलं कष्टकरी या साऱ्यांना झोपेचे खरे सुख क्वचितच उपभोगायला मिळते. उलट त्यांच्या झोपेच्या वेळापत्रकाबरोबरच, त्यांच्या खाण्यापिण्याचे, जेवणाचे ही वेळापत्रक पार कोलमडले जाते.ते सतत बदलत राहते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत असतात.
रात्रीच्या ठराविक वेळी अंथरुणावर पडल्या-पडल्या झोप येणे आणि सकाळी भल्या पहाटे कसलीही व्याधी (अंगदुखी, सांधेदुखी, पाठदुखी) न होता जाग येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते व या झोपेचा आनंद ही फार मोठा विलक्षणच असतो.म्हणूनच या बाबतीत पाखरांचा 'लवकर निजे लवकर उठे!' हा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे.
काहीवेळा झोप घ्यावीशी वाटते, सुखनैव निद्रा मिळावी म्हणून सारी पूर्वतयारी ही केली जाते. झोपेला अनुकूल अशा बाह्य साधनांचाही वापर केला जातो (उदा.मऊशार गाद्या, उश्या, ए.सी.इ.) पण मनच था-यावर नसेल कसली तरी अनामिक भीती काळजात घर करुन बसली असेल, नसेल कसली तरी अनामिक भीती चिंतेने मन पोखरलेले असेल तर सुखनैव निद्रा येईलच कशी? अशावेळी या समस्येवर उपाय म्हणजे ईश्वर चिंतन, वाचन, मनन याचा आधार घेण्यासारखा आहे. पण हे ही सा-यांच्या बाबतीत शक्य होत नसेल तर मग शांतपणे प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून एकाग्रतेने पडून राहणे काही वेळाने का होईना आपण निद्राधीन होण्याची शक्यता असते.असे म्हटले जाते "घेतो झोप, फिरोनी उठतो। हि ईश्वराची दया " ॥ तेव्हा अशा या ईश्वराच्या दयेचा पुरेपूर लाभ उठवावा तर निश्चितच प्रत्येक दिवस कसा हर्शोत्फुल्ल, आनंदमयीच जाईल.
काही मंडळी दुपारच्या विश्रांतीच्या नावाखाली यथेच्छ झोप काढतात. दुपारी वामकुक्षी ऐवजी अशा या डाराडूर झोप काढणे हे केव्हाही वाईटच! तरीपण घरातील बालके, वृद्ध स्त्री-पुरुष यांच्यासाठी ही दुपारची झोप ही उपयुक्त असते. त्यांनी ती आवश्य घ्यावी, पण त्याचबरोबर आरोग्यविषयक अन्य नियमही पाळावेत. (उदा. प्रमाणीत आहार, प्रमाणात विहार-व्यायाम, इ.)
आजचा युवावर्ग या झोपेच्या बाबतीत काहीसा बेफिकीरीने वागताना दिसत आहे.आपला कलेजचा अभ्यास ते क्लासेस शिक्षण पूर्ण होताच, नोकरी व्यवसायासाठी करावी लागणारी धावपळ, कम्पुटर, टीव्हि. मुव्हीज या सा-या जंजाळात तो इतका गुरफटत चाललेला आहे कि या सा-यातून त्याला झोपेसाठी वेळ काढणे दुरापास्त होऊ लागले आहे. तशातच आठवडा-पंधरवड्याने रात्रीच्या पार्ट्यांचे आयोजन या सा-यांमुळे झोपेसाठी त्यांना वेळ उपलब्ध होत नाही. अर्थात हे सर्वस्वी चुकीचेच नव्हे तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहे. रात्री बेरात्रीची ती जागरणे, चहा-कॉफीचे कमालीचे पेयपान, काहींच्या बाबतीत सोबतीला धुम्रपान अशा व्यसनांचा विळखा ही आपोआपच पडत जातो.सतत पुरेशी झोप न मिळाल्यामुळे निद्रानाशासारखे विकार जडतात आणि त्यातून स्वभाव चिडचिडा बनतो, दैनंदिन कामकाज नीट न होणे, डोकेदुखी, थकवा यासारखे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच वेळेवर अन्नपाण्याप्रमाणे झोपेचीही हयगय करू नये. घ्यावा विसावा, थकल्या जीवाला, म्हणूनच देवाने रात्र निर्माण केली आहे आणि म्हणूनच झोपेच्या बाबतीत बेफिकीर वृत्ती नसावी.
वाहनांचे कर्कश आवाज, मोठ्या आवाजात कर्णबधीर करून सोडणारी वाद्ये, गडबड, गोंधळ, लाउडस्पीकर हे सारे झोपेच्या मार्गातील अडथळेच असतात. त्यामुळे निवांत झोप घेता येत नाही.याशिवाय काही घटना, प्रसंग हि झोपेच्या आड येऊ शकतात. अशा वेळी प्राप्त परिस्थितीचा स्वीकाराण्याव्यातिरिक्त कोणताही इलाज नसतो.कित्येकदा ढाराढूर झोपलेले असतानाही हवी तशी पूर्ण विश्रांती मिळत नाही, याचे कारण त्यावेळी झोपेत आपण स्वप्नदृष्टीचा आस्वाद घेत असतो.
त्यादृष्टीने झोप हि आनंदाची गुरुकिल्लीच आहे आणि झोप हाच आनंदाचा पासवर्डच आहे.