मुंबई-गोव्या दरम्यान पहिल्या क्रूज सेवेचा लवकरच प्रारंभ. या सेवेमुळे पर्यटनाला मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या निधीतून समुद्र पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या संदभात आर्थिक तरतूद ही केली आहे. यानिमित्ताने मुंबईत दोन तरंगती रेस्टॉरंटची पण सुविधा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगीतले की मुंबई आणि गोव्यामध्ये सुरू होण-या या पहिल्या क्रूज सेवेमध्ये ५०० प्रवासी क्षमता आहे. ही सेवा १ ऑगस्ट पासून पूर्णतः सुरू होईल. केंद्रीय मंत्रालयाने या करीता सगळया पोर्टसला क्रूज टर्मिनल सेटअप करण्यास (सज्ज ठेवण्यास) सांगितल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई-गोवा क्रूज सेवा ऑगस्ट महिन्यात सुरू होणर-गडकरी