बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण (महाराष्ट्राला ११ पद्म पुरस्कार)

अशोक कुकडे यांना पद्म भूषण



सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक यांना पद्म विभूषण, प्रसिध्द अशोक कुकडे यांना पद्म भूषण तर प्रसिध्द नाटय दिग्दर्शक वामन केंद्रे, गायक शंकर महादेवन, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र व स्मीता कोल्हे यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.



दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी पद्म विभूषण पुरस्कार ४ मान्यवरांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कला व नाटय क्षेत्रातातील उल्लेखनीय योगदानासाठी तर अनिल कुमार नाईक यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.