रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

बाल साहित्यातील योगदानाबद्दल रत्नाकर मतकरी यांचा गौरव, तर फेसाटी या नवनाथ गोरेंच्या कादंबरीला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.


साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. देशातील एकूण ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वर्षासाठी जी साहित्य अकादमी पुरस्काराची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये या दोन मराठी साहित्यिकांची नावे आहेत. रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला जाहीर झाला आहे.