'बघ माझी आठवण येते का?'
चिकन मटण कापलं जात असताना खाटकासमोर
कापडाची, कागदाची पिशवी घेऊन रांगेत उभा राहा
हात लांबव, तळहातांवर झेल मच्छीचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक,
बघ माझी आठवण येते का ?...
कापडाची मोठी पिशवी घेऊन किराणा दुकानात जा
महिन्याभराचं सामान छोट्या-मोठ्या कागदी पिशव्यात घे
घरी येईस्तोवर गहू रव्यात अन तांदूळ मैद्यात गेलेला असेल
चाळणी घेज गहू, रवा, तांदूळ, मैदा चाळून वेगळा कर
बघ माझी आठवण येते का?...
ऐन वेळी गावी जायला ट्रेनचं बुकिंग मिळणार नाहीच
कुरकुर करीत नाईलाजाने एसटीत बसशील घाट पार करता करता तुला उलटी येऊलागेल कागदी पिशवी, बसची खिडकी, हाताची ओंजळ
उलटीचं घाण पाणी या सगळ्यांना पुरून उरेल
बघ माझी आठवण येते का?...
अफिसहून येताना नेमका पाऊस सुरु होईल छत्री अफिसमध्येच राहिलेली असेल
तू पाठीवरची बॅग डोक्यावर धरशीलभिजल्याची
डोकं, केस शाबूत राहिल्याचं समाधान मिळेल पाऊस सरल्यावर बॅगेतली कागदपत्रे भिजल्याची जाणीव होईल
पावसाचं पाणी पिऊन लॅपटॉपने आत्महत्या केलेली असेल
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?..
(A poem by प्लॅस्टिकची पिशवी)