राजधानीत रंगभूमीचा महाकुंभ !

राजधानी दिल्ली फेब्रुवारी च्या मध्यापासून एप्रिल पर्यंत नाटयरंगी न्हाऊन निघाली. रंगभूमीचा जागतिक सोहळा . म्हणजेच ८ वे थिएटर अलिंपियाड या काळात झाले. 'मैत्रिचा ध्वज' अर्थात फ्लॅग अफ फ्रेडंशिप हे या महोत्सवाचे घोषवाक्य होते. राष्ट्रीय नाटय विदयालय म्हणजेच 'एन.एस.डी.' चे संचालक श्री. वामन केंद्रे यांच्या अथक प्रयत्नांनी आणि संस्कृती मंत्रालय केंद्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. यानिमित्ताने देशविदेशांतील दिग्गज, नाटयलेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचा मेळा भारतात अवतरला. हे आठवे थिएटर अलिंपियाड भरविण्याचा मान यंदा भारताला मिळाला जगभरातील सांस्कृतिक विश्वातील भारताच्या वाढलेल्या दबदब्याचे प्रतिक म्हणजे हा जागतिक नाट्य महोत्सव भरविण्याचा सन्मान भारताला मिळणे होय! दिल्लीतल्या मंडी हाउस भागातील एन.एस.डी. चे आवार या काळात एक लग्नघरच बनले होते. नाट्य रसिक, कलाकार यांची मांदियाळी तेथे जमली होतीत्यानिमित्ताने विविध परिसंवाद,कार्यशाळांचे आयोजन, विविध खाद्यपदार्थाच्या दालनांची रेलचेल या परिसरात होती. जवळपास महिन्यांच्या या काळात देशांतील आणि भाषांतील उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी भारतीय नाटय रसिकांना मिळाली.



या महोत्सवात मराठी नाटकांचेहीआवर्जून मानाचे स्थान होते. विशेषतः दिल्ली कर रसिकांनी संगीत शारदा ते मौनराग अशा शतकातील मराठी नाटय तींचा आनंद लुटला. शहरांमध्ये साडेचारशे नाट्यप्रयोग झालेत्यात हे बंध रेशमाचे या नाटकातील चारुदत्त आफळे यांचा अभिनय, नाटयपद, अचूक टायमिंग याला आजही वेळोवेळी मिळणारी 'वन्समोअर' ची दाद अवर्णनीय होती. महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'मौनराग' यांच्या नाटकातील सचिन खेडेकर यांचे सादरीकरण पाठांतर, संवाद, शब्दफेक, प्रत्येकाच्या मनातील गावाकडची ओढ प्रेक्षकांना अंतर्मुख करुन गेली. युवा कलाकार दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याने मांडलेली तुकारामा ची पत्नी रुपातील रखमाई यांच्या नात्यातील सुरेख गुंफण संवाद,अभिनय, सादरीकरणाच्या माध्यमातून नाटक 'संगीत देवबाभळी' ने विशेष कौतुकची थाप मिळवली. 'मुक्ताई' या एकपात्री नाटयाने दिल्लीकरांना थेट पैठण देहू आळंदीचा प्रवास करवून आणला.संत परंपरेतील 'ताटी उघडा ज्ञानेश्वर', 'रेडयामुखी वेद' हे प्रसंग आजच्या युवापिढी पुढे अभिनयातून साक्षात साकार केले. ऑस्ट्रेलियातील महाराष्ट्रीयन मंडळाचे अभिराम भडकमकर लिखित नेपोलियन अल्मेडा दिग्दर्शित 'सुखांशी भांडतो आम्ही' हे सामाजिक आशयाचे कौटुंबिक नाटक विशेष भाव खाऊन गेल. विशेषतः जगाच्या पाठीवरही मातृभाषा मराठी वेगवेगळ्या माध्यमातून जपली जात आहे याचेच हे द्योतक होते. सतिश आळेकर लिखित दिग्दर्शित महानिर्वाण, इजिशा, महानिर्वाण, संगीत शारदा, विठ्ठल तुक्याचा, ती, पाऊले चालती पंढरीची वाट, वानरायन, वाय, अधुरे या मराठी नाटकांचा आस्वाद भारतीय नाटय रसिकांना दिल्लीच्या श्रीराम, कमानी, एल.टी.जी. या नाटयगृहातून घेता आला. पौराणिक, धार्मिक, संगीत, सामाजिक, लोककला इत्यादी अनेक विषयांवरील नाटकांचा यात समावेश होता. यानिमित्ताने नाटयविश्वाने दिवाळी नंतरची दिवाळी साजरी केली. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर उद्घाटन आणि तेवढ्याच ऐतिहासिक गेट वे अफ इंडियाच्या साक्षीने समारोप दिवस रंगलेल्या या महोत्सवाच्या निमित्ताने भारताच्या शिरपेचात एक मानाचाच तुरा रोवला गेला. (सौजन्य : मराठी जगत)