भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरा घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ - घरांत तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुगंधही अत्यंत सुंदर असतो. तसेच काही खाद्यपदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. अनेक आजारांवर चहामध्ये तुळशीची पाने टाकून चहा घेतला जातो. अशी बहुगुणी तुळस आपण भेटवस्तू रूपात ही देऊ शकतो असे आवाहन पर्यावरण अभ्यासक श्री. विजय गोळेसर यांनी जागतिक ओझोन दिवसा निमित्त केले आहे.
- आरोग्यासाठीचे फायदे
उत्तम औषधी गुणधमामुळे तुळस पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. श्वसननलिकेमध्ये असणा-या कफचा प्रभाव कमी करण्यातही अत्यंत गुणकारी ठरते. विविध औषधी गुणधमामुळेच तुळस अल्सर, गोवर, कांजण्या याच्या उपाचारामध्ये वापरली जाते. कापलेली किंवा दुसरी एखादी जखम झाल्यास त्यावर तुळशीचा रस म झाल्यास त्यावर तळशीचा रस आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण लावल्यास त्याचा लाभ होतो.
. तापामध्ये वापर
मलेरिया आणि डेंगींच्या तापाचा प्रभाव कमी करण्यातही तुळस गुणकारी ठरते. तुळशीची पाने उकळून चहाबरोबर रुग्णाला द्यावीत. तापाची तीव्रता अधिक असल्यास अर्धा लीटर पाण्यात वेलची पावडर, साखर आणि दूध याबरोबर तुळशीची पाणे उकळून घ्यावी आणि तीन तासांच्या अंतराने रुगणाला दिल्यास ताप कमी होतो. शरिराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम तुळस करते.
- घसा खवखवणे
घसा खवखवण्याचा त्रास होत असल्यास तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो.
- मुलांसाठी गुणकारी
लहान मुलांच्या सर्दी, ताप खोकला अशा रोजच्या आजारांमध्ये तुळशीच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी ठरतो. तसेच डायरिया, उलट्या याचा त्रासही त्यामुळे कमी होतो. कांजण्या झालेल्या असल्यास केसर आणि तुळशीच्या मिश्रणाचे सेवन केल्यास लाभ मिळतो. तसेच मुलांचे दात येताना मुलांना शी लागल्याने अशक्तपणा येत असतो. अशावेळी डाळींबाचा रस आणि वाळलेल्या तुळीच्या पानांची पावडर यांचे मिश्रण करून दिल्यास त्वरित आराम मिळतो.
- डोकेदुखी
तुळशीची पाने हे डोकेदुखीवर रामबाण उपाय म्हणून ओळखले जातात. तुळशीच्या वाळलेल्या पानांची गरम पाण्यात वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी एक चमचा वाळलेली तुळशीची पाने दोन कप पाण्यात टाकून एका मोठया भांड्यात गरम करावे. एका मोठया कपडयाने चेहरा झाकून त्याची ५ ते १० मिनिटे वाफ घ्यावी. तसेच तुळशीची पाने वाटून चंदनाच्या लेपाबरोबर डोक्यावर लावावे.
- मुरूम, पुरळयापासून संरक्षण
चेह-यावर मुरूम किंवा पुरळ येण्यापासून सरंक्षण करण्यात तुळशीची पाने उपयोगी ठरतात. रक्त शुद्ध करून टॉक्सिनचे प्रमाण कमी करत असल्याने या समस्या दूर राहतात. तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरीयल तत्व असल्याने त्याचा लेत चंदनाच्या लेपाबरोबर चेह-यावर लावाला. लिंबाच्या पानाच्या लेपाबरोबर मिश्रण करूनही चेह-यावर लावता येतो. त्यामुळे चेह-याची जळजळही कमी होते.
- हृदयासाठी उपयोगी
तळशीची पाने टॉक्सिनचे प्रमाण कमी करून रक्त शुद्ध करतात. तसेच तुळशीच्या पानांचा चहा रक्तदाब कमी करण्यात उपयोगी ठरतात. तुळशीच्या पानामध्ये असलेल्या औषधी तत्वांमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यात तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात फायदेशीर ठरतात. या सवार्मुले हृदयरोगांचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अत्यंत कमी होतो.
- तोंडाचा वास येणे
तोंडाचा वास येणे हे सर्वांसाठीच अत्यंत अपमानकारक ठरू शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास खचला जाण्याची शक्यता असते. तुशळीची पाने चावून खाल्ल्यास तोंडांचा वास येण्याची समस्या दूर होऊ शकते.