एखाद्या वास्तुमध्ये गेल्यानंतर खुप प्रसन्न वाटते त्यामुळे काम करायला खुप उत्साह वाटतो तर एखाद्या वास्तुमध्ये गेल्यानंतर, केव्हा येथून बाहेर पडतो असे होते. तर दुसरीकडे वास्तु परीक्षण करीत असताना हजारो दांपत्यानी माझ्याकडे कबूल केले कि ते जेव्हा घराबाहेर असतात तेव्हा खुप आनंदी असतात पण घरात पाऊल की दारात पाऊल त्यांच्यात वादविवाद/भांडणे सुरु होतात. यासारख्या शेकडो गोष्टी रोज आपल्या आयुष्यात होत असतात. याचा अर्थ तुम्ही ज्या वातावरणात राहतात त्याचा तुमच्या शारिरीक व मानसिकतेवर परिणाम होत असतो. म्हणूनच तुमच्या अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न करा, सहजपणे तुमचे मन व शरीर प्रफुल्लीत होते. याचाच अर्थ Changing Lives, Changing Karma; थोडक्यात प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता आणि त्यातूनच अत्कृष्ट कार्यक्षमता आणि यश प्राप्त होत असते.
थोडक्यात वास्तुशास्त्राला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो. तुमच्या जीवनात घडणा-या असंख्य गोष्टी, यश, किर्ती, संपत्ती, आरोग्य, सुसंवाद, शैक्षणिक प्रगती, विवाह, नोकरी, वैवाहिक जीवनातील सौख्य, प्रगती, बढती, स्थैर्य, वास्तु खरेदी, वास्तु सौख्य, यश-अपयश,
आजारपण, भांडणतंटे, कोर्टकचेरी, वरिष्ठांकडून त्रास, आयुष्यात होणारी कोंडी, संतानप्राप्ती, घटस्फोट, व्यवसायिक प्रगती, यश, समृद्धी, यासारख्या मानवी जीवनात घडणा-या एकूण एक गोष्टींवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो. याचा अर्थ फक्त एकमेव वास्तुशास्त्रच या सगळ्या गोष्टी घडविते असे नाही, तर या सर्व गोष्टीच्या घडण्यात वास्तुशास्त्राचा प्रभाव प्रंचड आहे.
वास्तुशास्त्र जन्माअगोदर :
. याचा अर्थ संतानप्राप्तीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो.
. ईशान्य दिशा संतान लक्ष्मी,
. अग्नेय दिशा स्त्री-शक्ती केंद्र तर नैऋत्य म्हणजे पुरुष-शक्ती केंद्र. त्यामुळे या तिन्ही दिशा वास्तुशास्त्र दृष्ट्या असणे आवश्यक असते.
- अर्थात वैद्यकीय दृष्ट्या तुमची प्रजजन क्षमता सक्षम असणे आवश्यक असते. -
- गर्भधारणेस विलंब होत असलेले दांपत्य एका विशिष्ठ दिशेत झोपल्यास, पोषक वातावरण निर्मितीस मदत होते. . गरोद
. गरोदर महिलेचे आरोग्य तसेच गर्भाची वाढ योग्य होण्यासाठी सुद्धा एक दिशा असते.
. तर दवाखान्यात प्रसुती विभागासाठीसुद्धा वास्तुशास्त्र एक दिशा सुचविते.
. नवजात शिशु तसेच बाळंतीणीसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी पण वास्तुशास्त्रात विशिष्ठ दिशा सुचित केलेली आहे.
. वर नमूद केलेल्या दिशांमध्ये वास्तुदोष असल्यास संतान प्राप्ती प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर वास्तुदोषांचे निराकरण केल्यास सदर प्रक्रियेस नक्कीच वेग प्राप्त होतो.
जन्मांतर्गत :
१) आरोग्य :
. चांगल्या आरोग्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या तर दुपारचे ऊन येऊ देऊ नका.
. घर अतिशय स्वच्छ ठेवा.
. घरातील अनावश्यक सामान-रद्दी त्वरीत विल्हेवाट लावावी.
. ईशान्य (North-East) दिशा आरोग्यासाठी अत्यावश्यक असते.
. तर अग्नेय (South-East) दिशा। आरोग्याला सुदृढता आणते.
. पण जर दोन्ही दिशांमध्ये वास्तुदोष असल्यास गंभीर आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
. अर्थात या सर्व वास्तुदोष समस्यांसाठी उपाय असतात.
२) आर्थिक-समृद्धी:
. एकूण ३२ दिशांपैकी ७ दिशांमधील प्रवेशद्वार आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत लाभदायी असतात.
. या प्रवेशद्वारांमधून येणारी धनसंपत्ती चिरःकाल टिकाणारी आणि वृद्धींगत होणारी असते तर अन्य प्रवेशद्वारांमधून येणारी धनसंपत्ती चंचल व अस्थिर असते.
. अग्नेय दिशेतील किचन सोबत विशिष्ट प्रकारची वास्तुरचना पैशाचा ओघ व चलनवलन अधिक सकारात्मक करते.
. विविध देवतांच्या यंत्रांचा वापर करुन आर्थिक समृद्धी प्रबळ करता येते
. तसेच वास्तुदोष निवारण सुद्धा करता येते.
३) शैक्षणिक प्रगती :
. ईशान्य दिशा निकोप म्हणजे वास्तुदोष विरहीत असणे फार महत्त्वाचे असते.
. वायव्य अथवा पश्चिम दिशेत भिंतीला पाठ करुन उत्तर-पूर्व दिशेकडे तोंड करुन अभ्यासाला बसणे अत्यंत लाभदायी असते.
. ईशान्य दिशेतील किचन, टॉयलेट, । बेडरुम, कट, जडत्व, या गोष्टी शैक्षणिक प्रगतीस हानिकारक असतात.
. देवघराचे स्थान, ईशान्य दिशा निकोप असणे तसेच पितृदोष यामुळे शैक्षणिक प्रगतीत अडथळे व सोबत पालक व मुलांमध्ये तणा निर्माण करण्यास कारणीभूत असतात.
४) सुखी वैवाहिक जीवनासाठी वास्तुशास्त्रानुसार घर असणे अत्यावश्यक असते.
. अग्नेय दिशेतील किचन स्त्री-शक्ती संतुलीत करते, तर नैऋत्य (South- West) दिशेतील मास्टर बेडरुम पुरुष-शक्ती प्रबळ करते.
. ईशान्य दिशा आर्थिक-शैक्षणिक व आरोग्य संतुलीत करण्यास मदत करते, तर
. तसेच वास्तुचा मधला भाग (ब्रह्मतत्व) खुले आणि वजनविरहीत असल्यास तेथील लोकांमध्ये एकोपा व समन्वय दृढ असतो.
५) सुंसवाद :
वास्तुमध्ये शांतता व आनंदी वातावरण निर्मीती मध्ये वायव्य दिशेची वास्तुरचना अत्यंत महत्वाची असते. व्यावसायिक आस्थापनांमध्ये तेथील कर्मचा-यांमध्ये सुसंवाद, एकोपा, एकमेकांवर दृढ विश्वास असल्यास सकारात्मक व लाभदायी काम होते व त्यासाठी त्या वास्तुचे ब्रम्हतत्व व वायव्य दिशा निकोप असण्याची गरज तीव्र असते.
६) कोर्टकचेरी :
याबाबत वास्तुचा वायव्य व अग्नेय भाग फार महत्वाची भूमिका पार पाडते. या दोन्ही दिशांमधील वास्तुदोष शासकीय दरबारात दिरंगाई, व्यावसायिक वैमनस्य, वरिष्ठांकडून त्रास अथवा छळवणूक तसेच पोलीस व कोर्टकचेरीच्या प्रकरणंना सामोर जाण्याची पाळी येते. अर्थात योग्य तज्ञांमार्फत उपाययोजना केल्यास चांगले परिणाम घडून येण्यास नक्की मदत होते.
. घटस्फोट किंवा पती पत्नीमधील संबंधामध्ये दुरावा निर्माण होण्यास दक्षिण व नैऋत्य दिशेतील तीनपेक्षा अधिक वास्तुदोष कारणीभूत ठरतात.
. कर्जाबाजारीपणास :
दक्षिण तथा नैऋत्य दिशेतील खड्डा पाणी, उतार, सर्वात कमी वजन, जल/अग्नी/ वायु तथा आकाश तत्वाचे अस्तित्व यासारख्या वास्तुदोषांमुळे आर्थिक नुकसान, प्रचंड तोटा अथवा कर्जबाजारीपणा कारणीभूत ठरत असतात.
. ईशान्य दिशा : पैशाचा ओघ, व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देतो तसेच नवीन संकल्पनांचा उगम पण याच दिशेतून साध्य होतात.
. अग्नेय दिशा : सर्व प्रकारची उत्पादकता वाढविणे, दिरंगाई टाळणे, वायफळ खर्च रोखणे व प्रगतीला गती प्राप्त करुन देण्याचे काम करते.
. नैऋत्य दिशा : आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देते. तसेच शारिरीक-मानसिकसामाजिक व अन्य सर्व प्रकारचे स्थैर्य प्राप्त करुन देते. नेतृत्व गुण विकसीत करते.
. वायव्य दिशा : संस्थेत काम करणा या सर्व व्यक्तींमधील सुसंवाद वाढवून प्रसन्न वातावरणातून उत्तम उत्पादकता निर्माण करते.
. ब्रम्हतत्व : त्या संस्थेतील सर्वांमध्ये एकोपा-एकजूट-समन्वय सुदृढ करते.
. वास्तुशास्त्र हा विषय प्रचंड मोठा आहे. तसेच मानवी जीवनातील सर्व पैलूंची चर्चा करण्यास किमान एक पुस्तक लिहीता येईल परंतु जागेअभावी अधिक लिखाण शक्य नसल्याने अपाल्या शंका, प्रश्न, समस्या आम्हास लिहून कळविल्यास मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहोत.