स्थावर मालमत्ता आणि कायदयाचे ज्ञान

तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनीलाच पैसे मिळतील का?



वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही 'Affcource!' असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो! हिस्साच हिस्साच


तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स मध्ये पैसे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैसे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का?


'Nomination' बद्दलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का?


तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणाला तरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का?


तर उत्तर आहे - नाही


शकिंग?


खालील उदाहरण पहा !


महेश हा ५५ वर्षांचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे.


अचानक महेशचा अॅक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मूल संपत्ती साठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांनमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला !


असे का झाले ?


महेशने बायको ला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्या नंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succesion Law' (वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir' (वारसदार) मध्ये समान वाटणी झाली.


'Succession Law' समजून घ्या!


'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची काळजी घेऊन ती Legal Hairs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.


नॉमिनी अस्सेट ला होल्ड करु शकतो पण अस्सेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Hair' च असतात.


मग 'Legal Hair' कोण असतात?


'Legal Hair' ते असतात जे Succession Act Act मधे नमूद केलेले आहेत. जर तुम्ही Will बनविली बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal will' नाही बनवली आहे तर 'Succession Act' नुसार तुमचे legal will' ठरवले जातात.


'Succession Law' चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पोलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत.


 मित्रानों इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे. तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे.


नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो.


मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे!


आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरुन आपल्या वारसांमधे भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टण्यावर मृत्यूपत्र बनवणे अतिशय महत्वाचे असते.


सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नॉमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नॉमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमची प्रॉपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो.


सगळयाच्या दृष्टीने अतिशय महवाची माहिती आहे वाचा व वेळीच सावध व्हा...