ग्रीन दिल्ली क्लीन दिल्ली चा संदेश देणार श्री. गणेश सेवा मंडळ, लक्ष्मी नगर

मन की बात मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मन की बात मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केल्यानुसार श्री. गणेश सेवा मंडळ, लक्ष्मी नगर दरवर्षीच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतेच, यावर्षी 'ग्रीन दिल्ली-क्लीन दिल्ली' ही थीम घेऊन हे मंडळ, गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे अध्यक्ष श्री. महेन्द्र लढ्ढा आणि त्यांच्या पदाधिका-यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान १७००० रोप प्रसाद रूपात देण्यात येणार आहे. याशिवाय ही गुरूग्रामचा सार्वजनिक गणेशोत्सव, दिल्ली येथील सार्वजनिक उत्सव समितिचा महाराष्ट्र महोत्सव, दिल्ली मराठी प्रतिष्ठान तर्फे विविध मंडळांच्या गणेश आरास स्पर्धा, वनिता समाजाच्या पाककला स्पर्धा, पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ जादूचे प्रयोग, रांगोळी स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे.