समस्त जावईबापुंनो
थोडासा बदल करा
जुन्या चालीरिती आता
तुम्हीच बंद करा
महागाईच्या या जमान्यात
सासरेबुवांची दमछाक होते
तुमच्या धोंडेजेवणामुळे त्याचे
बॅकबॅलेन्स संपुन जाते
मी काय म्हणते जावईबापु
या वर्षी जरा उलट करा
सोन्याचे मेजवानीचे तुमच्या तर्फे
सास-यानां धोंडेजेवण करा
करुन बघा खर्च जरा तुमच्या
बायकोच्या आई वडिलांसाठी
जावई व लेकही असतात हो
त्यांच्या म्हातारपणाची काठी
संकल्प करा मी आता काही
सासरचे घेणार नाही
त्यांना मात्र संकटात कधीच
अंतर देणार नाही
महीलांनो खर्चाला आपणही
चांगलाच आळा घालूऊयात
दानधर्म करण्यापेक्षा गरजूंना
सढळ हाताने मदत करुयात
गंगास्नान करण्यापेक्षा
गंगास्वच्छ ठेज्यात
स्वच्छतेतुन समृद्धीकडे
स्वच्छ भारताचा वसा घेऊयात
मर्तीमध्ये देवशोधण्यापेक्षा
माणसांत देव शोधून पाहु
घरीच करुन अन्नदान आपण
देवाला ह्दयातच शोधुन पाहू
शेवटी काय काटकसरीने
संस्ती टिकवायची आहे
जावयांना, महिलांना, माणसाला
आपल्यालाच जागे करायचे आहे.