अद्वैत


चंद्रभागे काठी जमते


दाटी ही जनांची


मानांनाही भरते येते


ही लीळा खेळीयाची,


जो तो दिसे इथे रमला


जरा ना दुरावा


एक यान बांधी सर्वां


दुजा ना विसावा,


नाम एक ओठी वाहे


दुसरा न संग


एकतान म्हणती सारे


भजा पांडुरंग,


काम, क्रोध, मोह, मद,


मत्सर वारते


विठुमाऊली सारे


सद्गुण तारते,


एकरूप होऊजाता


सत्त्व ते सरेना


विठ्ठपायी येता भक्त


एकला उरेना


देव-भक्त; भक्त-देव


एकज्योत होती


अखंड तेवती ती


अद्वैतशी नाती.