भारतीय आस्था आणि पर्यावरण संघावाय

आज आमचे जीवन सुविधांच्या जंजाळात जखडून गेले आहे. या सुविधा प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाला थोडेफार आरामदायी बनवत आहेत. पण, आरामाच्या या सवयीमूळे सुविधांविषयी ओढ वाढून मनुष्य निसर्गापासून दूर गेला आणि मागे राहिला. सुविधाभोगी झालेला मनुष्य साधनांचा गुलाम बनला.साधनांच्या बैपुल्यात कुठेतरी दबून गेला. साधने मोठी बनल्याने मनुष्य छोटा दिसू लागला.



भारतात शुभ कर्म व्यापारापोटी सर्व उद्योगकर्ते आपल्या कमाईचा एक दशांश भाग धर्मार्थाच्या नावावर खर्च करायचे. पाणी आणि वृक्ष, गाय आणि अन्न हे दोन्ही बसुंधरा आणि मानवतेच्या हिताचे आहेन गाय निसर्गापासून कमी घेते आणि मानवतेसाठी जास्त देते. नीर (पाणी) पंचमहातत्त्व विलीन करून पूर्ण स्त्रीची (सृष्टी) निर्मिती करते. स्त्री जन्मदात्री आहे. तिला आई म्हणतात. तो सृष्टी असू शकते. वसुंधरा असू शकते महिला असू शकते. जी जन्म देते ती स्त्री आहे. त्यामुळेच भारतात जोपर्यत नीर (पाणी), नारी (स्त्री) आणि नदी यांचा सन्मान होत होता, तोपर्यंत भारत जगतगुरू राहिला. येथील पर्यावरण आणि पाणी कधी बिघडले नाही. गेल्या दोनशे वर्षापासून नीर, नारी आणि नदी बाजारात विकली जाऊ लागली तेव्हापासून भारतात, महाराष्ट्रात, मराठवाडयात जलसंकट वाढायला सुरुवात झाली. भारतीय आस्था आणि पर्यावरण रक्षणात त्याचा तोडगा आहे. राजस्थानात ज्याप्रमाणे आम्ही लोकविज्ञानात आस्था ठेवून त्यापासून बोध घेऊन जल संरक्षणाचेकाम केले, त्यामुळे पाणीहीन होऊन उजाड झालेली १२०० गावे पुन्हा जलमय झाली आणि मृतवत झालेल्या सात नद्या पुन्हा जिवंत झाल्या.


आज आमचे जीवन सुविधांच्या जंजाळात जखडून गेले आहे. या सुविधा प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाला थोडेफार आरामदायी बनवत आहेत. पण, आरामाच्या या सवयीमूळे सुविधाविषयी ओढ वाढून मनुष्य निसर्गापासून दूर गेला आणि मागे राहिला. सुविधाभोगी झालेला मनुष्य साधनांचा गुलाम बनला. साधनांच्या बैपुल्यात कुठेतरी दबून गेला. साधने मोठी बनल्याने मनुष्य छोटा दिसू लागला.


आम्ही दुहेरी संकटातून जात आहोत. एकीकडे निसर्गापासन दुराबून सुविधाभोगी बनून पंगू होत आहोत आणि दुसरीकडे बाजारांच्या मध्ये उभे राहून स्वतःला मूल्यवान वनविण्याऐवजी मूल्यहीन बनवत आहोत. ही मूल्यहीनता एकीकडे आम्हाला मूल्यविहीनही करीत आहे. हीच मूल्यविहीनता हिंसा, द्वेष आणि क्रीर्याच्या रूपाने बारंबार बोलकी होत असते. केवळ बोलकीच होत नाही तर आम्हाला आव्हानही देत असते. हे आव्हान मनुष्याला किंकर्तव्यविमूढ बनविते आणि तो आदर्शाविषयी बोलायचे बिसरून जातो. आदर्श त्याला परके बाटू लागतात. आदर्श आणि व्यवहाराचे तर्क मांडणारे तमाम लोक माणुसकीची ही मूल्यविहीनता व्यक्त करीत राहतात. करुणा-मैत्री, शांती-अहिंसा आणि सत्यासारख्या मूल्यांना गमावल्यानेच मनुष्य पोखरून निघतो. मूल्ये गमावून मनुष्य क्षुल्लक बनतो, तेव्हाच सभ्यतेपुढे एक नबे संकट उभे ठाकते. हे संकट मूल्यांचे आहे. 


पाश्चात्य इतिहासकारांच्या नजरेतून सिंधू खोन्याची संस्कृती ही वैदिक काळापूवींची संस्कृती मानती जात आहे. ही सभ्यता ई. पू. ३००० ते १५०० मधील अत्यंत आधुनिक शहरी संस्कृती मानली जाते. या संस्कृतीत निसर्गाचे प्रतीक पिंपळाला जीवनदाता मानले जायचे. सिंधू खोन्याच्या संस्कृतीशी संबधित मुद्रांमध्ये भांडयांवर कोरलेल्या पिंपळाचे वृक्ष या गोष्टीची साक्ष आहे. या काळात पिंपळाला प्राणदाता, जीवनदाता मानले गेले. या काळात देवतांनी पिंपळाच्या शाखांचा मुकूट धारण केला आहे. आपला मुकूट तयार करण्यासाठी ते पिंपळाच्या वृक्षाच्या रक्षणासाठी असुरांशी युद्ध करतात. त्या युद्धात मुख्यतः देवतांचाच विजय होतो. एकदा असुरांचा विजय होऊन ते पिंपळाच्या काही शाखांवर आपले नियंत्रण प्रस्थापित करतात. पण, लवकरच देव असुरांना ठार करतात. अशाप्रकारे वृक्षांना देव मानून त्यांची पूजा करण्याचे काम या संस्कृतीमध्ये भरीवपणे झाले आहे.


येथील आदिमानव जंगली प्राणी आणि निसर्गाच्या प्रकोपाला संकट मानत नव्हता. उलट निसर्गाने आपल्याला दिलेला प्रसाद समजून तो सन्मानाने स्वीकारत होता. पण, मानवाचे मन सुख आणि सुविधांचे इच्छुक असते. हा लोभच मानवाच्या मनात उद्भवला. त्यामुळेच येथे शिकार आणि मासे पकडण्याची हत्यारे, दगडाची तीक्ष्ण हत्यारे, लाकडाचे हातमाग, विविध प्रकारच्या भांड्या-कुंड्यांचे अवशेष चित्रांकन पाषाण युगातील लोकांचे जीवनमान समजून घेण्यास हातभार लावते. जंगलात निर्माण झालेल्या वस्तूंचे संचयन करून आणि शिकार करून ते आपला चरितार्थ चालवायचे. हळूहळू काही लोकांनी इतरांनी गोळा केलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू केली. त्यासाठी एक विशेष वर्ग तयार झाला. सुरुवातीला येथे कोणताही वर्ग नव्हला. जसजसे उत्पादन सुरू झाले तसा वर्गही निर्माण होऊ लागला. त्यासोबतच निसर्गाचे वेगाने शोषण सुरू झाले. मग केंद्रीकरण होऊ लागले. संपन्न वर्गाच्या हाती राज्यसत्ता आली. तिथूनच संस्कृतीच्या मुक्कामाचा श्रीगणेशा झाला. या कालखंडात मनुष्य फार पूजाअर्चा करीत नसे. पण पशू वृक्षसाख्या नैसर्गिक घटनांना आध्यात्मिक महत्त्व लाभायचे. हा आदिमकाळ शिकारी- जमातींचे भौतिक जीवन प्रतिबिंबित करतो. त्यात लोक एकमेकांशी 'धराडी' परंपराही गुण चिन्हवादाची अतिविस्तृत सामाजिक-नैसर्गिक संबंधांचे चांगल्या प्रकारे वर्णन करते. सांख्य काळातही निसर्गामध्ये पूर्ण आस्था बाळगली जायची असे त्याच्या आधारे म्हणता येते.


तोच आता जीवन-मरणाचा प्रश्न बनला. पर्जन्यासाठी केले जाणारे उत्सवरूपी जादुई कर्मकांड आणखी एक लक्ष्य बनले. वसंत आणि कापणीच्या हंगामाचे उत्सव नियमितपणे साजरे केले जाऊ लागले. हे सर्व उत्सव लोकांच्या व्यावहारिक कामाकाजाशी संबधित होते. या युगात मुख्य ध्येय अन्नधान्याची निर्मिती वाढविणे हेच होते. मुले जन्माला घालणारी स्त्री आणि पीक निर्माण करणारी जमीन यांच्यात अदृश्य संबंध आहे. यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पिकांच्या प्रोत्साहनासाठी स्त्री-पुरुष संभोगाचे अनुष्ठान करायचे.


सिंधू खोन्यातील प्राचीन संस्कृती हळूहळू विकसित होत निसर्गाच्या नियर्गाच्या नियमानुसार समाप्त झाली. त्यासोबत आणि त्यानंतर वैदिक संस्कृतीया प्रभाव वेदांतकाळ आणि मग ब्राम्हाणकाळातून मार्गक्रमण करता करता येथे क्रौर्याने मूळ धरले. हिंसा, दुःख पीडा या सर्व निसर्गाविरोधी शक्ती उभ्या राहू लागल्या. निसर्गविरोधकांमध्ये 'सत्ते' साठी संघर्ष, हिंसाचार बाढला आणि सर्वत्र हाहाःकार माजला. आजपासून सुमारे 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांसारखे शांतीचा संदेश देणारे. अवतार जन्माला आले आणि त्यांनी चौफेर अहिंसेचा संदेश दिला. याच काळात भगवान महावीरांचा जन्म झाला आणि त्यांनी 'अहिंसा परमोधर्मा' ला परमोच्च शिखराबर पोहोचविले.


त्यानंतर येथे सांख्य दर्शनाचा प्रभाव बाढला. या काळात निसर्ग अविनाशी, अनादी आणि अनंत मानला गेला. अनेकानेक रूपांच्या या जगाचा क्रमिक विकास निसर्ग किंवा प्रधानामुळे झाला आहे जो बोधहीन आणि संवेदनाहीन आहे. अविकसित आणि अरूप आहे. असे सांख्याने शिकविले. त्याची उत्पत्ती पंचेबीस सिंद्धात किंवा तत्त्वांच्या क्रिया-प्रक्रियेतून झाल्याचे सांख्याने मानले आहे. गाय दुध देते, दुधापासून लोणी तयार होते, तेवढीच ही उत्स्फूर्त क्रिया आहे. असे सांख्याने मानले आहे.


वैशेषिक दर्शनात कणाद ऋषींनी अणूंपासून विश्वाचा विकास झाल्याची कल्पना मांडली. त्यांनी भौतिक तत्त्वांना 


'क्रियामाणवत् समवायि कारण-मिति द्रव्यलक्षणम' पृथ्वी, आप (जल), तेजस (अग्नी), वायू (हवा, आकाश), ईश्वर, काळ (वेळ), दिक् (आकाश), आत्मन् (आत्मा) आणि मनस (मस्तक) या द्रव्यांमध्ये वाटून पाहिले.


योगातही निसर्गाच्या सत्तेप्रती आस्था होती. याच प्रकारे मीमांसा दर्शन मूलभूत स्वरूपात अनिश्वरवादाच्या पार्श्वभूमीवर पोहोचले होते. पण, वेदांची अक्षुण्णता आणि चिंरतर उच्चारित ध्वनींच्या पूर्ण पवित्रतेचा सिद्धांत कर्मकांड आणि यज्ञांवरील अंधविश्वासासोबत मीमांसा प्रणालीचा संपूर्ण आदी आणि अंत बनला होता.


महाराष्ट्र हे भरपूर पाणी असलेले समृद्ध राज्य होते. येथील पिकांचे चक्र पर्जन्यचक्राशी जोडले गेले नाही. कृषी उद्योग, विशेषतः साखर उद्योगाला चालना देण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करणान्या उसाच्या पिकाला प्रोत्साहन मिळाले. उसाच्या पिकाने महाराष्ट्राच्या भूमीला पाणीहीन केले. गंगायमुनेच्या क्षेत्रात होणान्या उसाच्या पिकामुळे तेथील भूजल भांडाराच्या पुनर्भरणासाठी हातभार लागतो. असे मराठवाड्यातील उसाच्या पिकामुळे होत नाही. येथे एकीकडे उसाच्या पिकासाठी पाणी खर्चिले जाते, तर दुसरीकडे साखर उद्योगामुळेही मोठे प्रदूषण होते. जमिनवरील पाणी, जमिनीच्या किंचित खालून वाहणारे पाणी, भूजल आणि खूप खोलवरचे पाणी उद्योगामुळे प्रदूषित होऊ लागले. पण येथील पिकांचे चक्र बदलने नाही. त्यामूळे हवामान बदलाचा मार आणखीच बाढत गेला.


विद्यमान सिंचन व्यवस्था कंत्राटदारांच्या हाती आहे आणि ठेकेदार हे कधीच निसर्ग किंवा बसुंधरेच्या हिताचा विचार करीत नाहीत. ते केवळ आपल्या कंपनीच्या फायद्याचा विचार करतात. ते शुभ विचार करीत नाहीत, असे मी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त अधिवेशनातं महाराष्ट्र सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला. शुभचा दुसरा अर्थ म्हणजे 'सर्वांच्या भल्यासाठी होणारे पुण्यकर्म', पुण्य कर्मानेच पर्यावरणात सुधारणा होते. मानसिक पर्यावरण आणि निसर्गाचे पर्यावरण सुधारण्यासाठी भारतात नेहमीच संयुक्त पुण्यकर्म होत आले. सारे जेव्हा लाभाच्याच काला जुपून घेतात तेव्हा शुभ कर्म विरून जातात. आम्हाला फायद्यापेक्षा शुभ कर्माची काळजी घ्यावी लागेल. भारतात शुभ कर्म व्यापारापोटी सर्व उद्योगकर्ते आपल्या कमाईचा एक दशांश भाग धर्मार्थाच्या नावम्बर खर्च करायचे. पाणी आणि वृक्ष, गाय आणि अन्न हे दोन्ही वसुंधरा आणि मानवतेसाठी जास्ट देते. नीर (पाणी) पंचमहातत्व विलीन करून पूर्ण स्त्रीची (सृष्टी) निर्मिति करते. स्त्री जन्मदात्री असते. तिला आई म्हणतात. ती सृष्टी असू शकते. वसुंधरा असू सकते, महिला असू सकते. जी जन्म देते ती स्त्री आहे. त्यामुळेच भारतात जोपर्यंत नीर (पाणी), नारी (स्त्री) आणि नदी यांचा सन्मान होत होता, तोपर्यंत भारत जगतगुरू राहिला. येथील पर्यावरण आणि पाणी कधी विघडले नही. गेल्या दोनशे वर्षांपाशून नीर, नारी आणि नदी बाजारात बिकली जाऊ लागली तेव्हापासून भारतात, महाराष्ट्रात, मारठवाड्यात जलसंकट वाढायला सुरूवात झाली. भारतीय आस्था आणि पर्यावरण रक्षणात त्याचा तोडगा आहे. राजस्थानात ज्याप्रमाणे आम्ही लोकविज्ञानात आस्था ठेवून त्यापासून बोध घेऊन जल संरक्षणाचे काम केले, त्यामुळे पाणीहीन हो उजाड झालेली १२०० गावे पुन्हा जलमय झाली आणि मतृवत झालेल्या सात नद्या पुन्हा जिवंत झाल्या. त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रात जलयुक्त शिवार नावाने योजना राबविली जात आहे. या योजनेला ठेकेदारांपासून वाचवून सामूहिक प्रयत्नांद्वारे जलसंबर्धनाचे काम केले जात आहे. हे काम सामूहिक विकेंद्रित जल व्यवस्थापनाच्या माध्यामातून केले तर महाराष्ट्राची भूमि पुनः जलमय बनेल. शेतांमधील मातीत ओलावा वाढताच हिरवळ जन्माला येईल. हिरवळ वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडसारख्या विषारी वायूंना शोषून त्यांचे प्राणवायूमध्ये रूपांतर करते. वातावरण विषारी वायूंच्या जागी प्राणवायू बाढताच पर्यावरणात आपोआप सुधारणा होते. पर्यावरण सुधारण्यासाठी भूमीवर हिरवळीत बाढ होणे आवश्यक आहे आणि हिरवळ केवळ मातीत ओलावा बाढल्यानेच निर्माण होऊ शकते. जेव्हा मातीत ओलावा किंबा आर्द्रता नसते, तेव्हा हिरवळ नष्ट होते. जलयुक्त शिवार हे मातीत ओलावा करणारे काम आहे. हे काम महाराष्ट्रने प्रधान्याने करायला हवे. पहिल्या वर्षात या योजनेत खूप चांगले काम झाले. त्यामानाने या वर्षी अपेक्षापेक्षा कमी काम झाले आहे. आम्हाला अधिक निर्धाराने, प्रामाणिकपणे आणि प्रतिबद्धतेने जास्त काम करायला हवे. महाराष्ट्र सरकारने हे काम संकल्पबद्धतेने केले तर पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला टँकरमुक्त आणि टंचाईमुक्त करून महाराष्ट्राला जलसमृद्ध राज्य घोषित करता येईल. ज्या प्रकारे आम्ही प्रतिकूल काळात वाईट लोकांना धडा शिकविण्यासाठी राखीव पोलिस आणि राखीव सैन्यदल ठेवतो, त्याचप्रमाणे सर्वत्र जल बँका तयार करणे आणि सज्ज ठेवण्याची गरज आहे. किमान पाच वर्षांचा दुष्काळ विचारात घेऊ भूजल भंडार आणि जमिनीबरील पाण्याचे साठे निर्माण करायला पाहिजेत.


अशा जलसाठ्यांच्या निर्मितमुळे आपल्याशी पाणी अपलब्ध आहे आणि पाण्यासाठी आपल्याला कधी त्रस्त व्हावे लागणार नाही, असा विश्वास जानतेच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात कर्जवाजारीपणामुळे होणान्या आत्महत्याही थांबतील. आमचे मानसिक पर्यावरण विघडल्यामुळे आत्महत्या होतात. जेव्हा आमचे मन निराशेत बुडत जाते, आशा संपुष्टात येतात, तेव्हा आम्ही आत्महत्या करू लागतो. जोपर्यंत नीर, नारी, नदी यांच्यापासून आमच्या अशोचे स्त्रोत कोरडे पडतात आणि निराशा प्रबळ होत जाते, तेच आमच्या अशोचे स्त्रोत कोरडे पडतात आणि निराशा प्रबळ होत जाते, तेच आमच्या पर्यावरणाचे सर्वात भयानक संकट ठरते. त्या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण दिनी एकजूट होज नीर, नारी आणि नदीचा सन्मान वाढवायला हवा. त्यामुळे आमच्या आशांचे दीप प्रज्वलित होतील. आमच्यावरून कर्जाच्या निराशेने ढग हटतील आणि आम्ही नव्या आशेने पाणी व पर्यापवरणाच्या संकटावर तोडगा काढून नवा मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र, भारत जग निर्माण करण्यात गढून जाऊ