पुरूषोत्तम मास अर्थात अधिक मास चार वर्षात एकदा येतो. धार्मिक व पुण्य कार्ये करण्यासाठी हा महिना विशेष उपयुक्त आहे.अधिक पुण्य गाठीला बांधण्यासाठी या महिन्याचा उपयोग करून घ्यावा.
श्राद्ध, स्नान व दान ही तीन कर्मे प्रामुख्याने या महिन्यात होतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासह अनेक पुण्यफल देणारा हा महिना आहे.
मुक्ती मिळविण्यासाठी मनुष्यजीव आयुष्यभर काही ना काही करत असतो. पण तरीही त्याला मुक्तीचा मार्ग काही मिळत नाही. तो मार्ग जाणून घेण्यासाठी अधिक मास उपयुक्त आहे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास हा मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करणे केव्हाही चांगले.
भागवत वाचणे हाही पुण्यफल मिळविण्याचा एक मार्ग आहे. कारण भागवताचे महात्म्य अपार आहे. त्यातही अधिक मासात ते वाचणे अधिक पुण्यदायी आहे. विष्णूनेच अधिक मास पुण्य कमाविण्यासाठीच तयार केला आहे. हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते. त्यामुळे त्याला मारण्यासाठी हा अधिक मास विष्णूने निर्माण केला होता.नरसिंह अवतार घेऊन विष्णूने हिरण्यकश्यपूला संपवले होते.त्यामुळे सहाजिकच हा मास त्याच्या स्तवनाचा आहे.
विष्णूचा जप या महिन्यात करावा.या जपाने नक्कीच मुक्ती मिळू शकते.
सर्वात उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत, तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो.
अधिक महिना धार्मिक वा अध्यात्मिक हेतूंच्या प्राप्तीला सहाय्यकारक महिना मानला जातो. संसारचक्रात अडकलेल्या सामान्यजनांना एरवी परमेश्वर व अंतिमत- मोक्ष प्राप्तीसाठी काही करावे याची जाणीव रहातेच असे नाही.परंतु, अधिक महिना हा चार वर्षात एकदा येत असल्याने या महिन्यात ही जाणीव होज काही धर्मत्ये करण्याची मनाची तयारी होते.
भारतीय ज्योतिषात अधिक मासाला 'तेरावा महिना' म्हटले आहे. सूर्य बारा राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. महिने, दिवस व चार घटकांनंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, तो अधिक महिना मानला जातो.
अधिक महिना असलेले वर्ष दिवासांचे असते.इतर वर्षात दिवस तास, मिनिट व सेकंद असतात.
या महिन्यात दानाचे विशेष महव आहे.तिथीनुसार दान केल्यास बरेच पुण्य पदरात पडते.
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास दिवस, तास मिनिटे आणि साडे सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले हिंदू चांद्र मास(महिने) मात्र दिवसातच म्हणजे दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात.उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात.ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय.सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षात होणारा दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.
रापासून आश्विन महिन्यांपर्यंतच्या कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुस-या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिक महिना आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की वर्षांनंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊशकतो.
केव्हाकेव्हा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो.अश्यावेळी क्षयमास येतो.