एक 'जी.आर.जेंव्हा' नदी जिवंत करतो!

 अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील कमळगंगा' झाली प्रवाहीत


केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या प्रेरणेतून महाराष्ट्र सरकारनं काढला शासन निर्णय.



अकोला : एखादा शासन निर्णय परिस्थितीत बदल घडवू शकतो काय? याच सकारात्मक उत्तर मिळंतय अकोला जिल्ह्यात उभ्या झालेल्या एका आभाळभर कामातून. यातून मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीचं अक्षरशः पुनरज्जीवन झालंय. या नदी पात्राचं तब्बल तेरा किलोमीटरपर्यंत रूंदीकरण अन खोलीकरण करण्यात आलंय.पहिल्याच पावसात ही नदी पाण्यानं भरलीये. या सकारात्मक अन ऐतिहासिक बदलांना कारण ठरलाय तो शासन निर्णय. अकोला जिल्ह्याला जलसमुद्र करू पाहणारा हा निर्णय. अन त्याच्या अंलबजावणीतून उभं झालेलं आभाळभर काम. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदी. तालूक्याची जीवनवाहिनी. कधीकाळी कोरडीठाण असलेली कमळगंगा सध्या पाण्यानं ओसंडून वाहतेय. मंडळी, ही किमया साधलीय एका शासन निर्णयानं. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी राज्याच्या मृद आणि जलसंधारण विभागानं एक अध्यादेश काढलाय. या निर्णयानुसार सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधणीसाठी आवश्यक असलेली माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजकरिता जलसंधारण उपचाराच्या कामांची सांगड घालण्यात आली आहे. यातून मूर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीचं अक्षरशः पुनरज्जीवन झालंय. या नदी पात्राचं तब्बल तेरा किलोमीटरपर्यंत रूंदीकरण अन खोलीकरण करण्यात आलंय. केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा शासन निर्णय करण्यात आलाय. या निर्णयानुसार नदी खोलीकरण-रूंदीकरण, नवीन शेततळे खोदणे, शेततळयांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला, साठवण तलाव व पाझर तलावातील गाळ काढणे इत्यादी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहे. या खोदकामातून निघणारी माती, मुरूम व दगड इत्यादी गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येत आहे. आता एकदोन पाऊस झाले आहे.



अगदी कोरडी ठाक असलेली कमळगंगा भरल्याने हातगावातील संदीप कथलकर या शेतकयाच्या चेह-यावरचा आनंद सध्या ओसंडून वाहतोय. कारण, वाढलेल्या पाणीपातळीमूळं तो खरीपासह रब्बी हंगामासाठीही आश्वस्त झाला आहेअश्या पद्धतीने मूर्तिजापूरातील हे पाणीदार काम म्हणजे वाळवंटात फुललेली हिरवळच म्हणावी लागेल.