शिल्पकार उत्तम पाचारणे ललित कला अकादमीच्या अध्यक्ष पदी

प्रसिध्द शिल्पकार उत्तम पाचारणे यांची ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. श्री पाचरणे एक प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी कला क्षेत्राच्या विविध पदांवर काम केले आहे. सध्या, ते, गोवा कला अकादमीचे सदस्य आणि सल्लागार समिती सदस्य, पुल देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आणि बोरिवली येथील जनसेवा सहकारी बँकेचे संचालक पदावर कार्यरत आहेत. कार्यरत आहेत.


श्री उत्तम पाचारणे हे सर जे.जे. स्कूल अफ आर्टस मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून पदवीधारक आहेत. १९८५ साली त्यांना राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, १९८५ मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रफुल्ल डहाणूकर फाऊंडेशन या संस्थे कडून जूनियर राष्ट्रीय पुरस्कार १९८६ मध्ये तर वर्ष २०१७ मये जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहे. श्री. पाचरणे यांची अध्यक्ष पदाची ही नियुक्ति तीन वर्षां करताची आहे.