जगबुडी आली हो.. जगबुडी आली...
जगबुडी आली हो... जगबुडीऽऽऽ आली
जगबुडी म्हणजे काय हो ताई? जग पाण्यात बुडणार??
छे छे... एवढे पाणी शिल्लक ठेवले आहे का तुम्ही आम्ही??
जगबुडी म्हणजे पाण्यात नाही पण पाण्याअभावी ही सुंदर पृथ्वी नष्ट होणार.
अन् ते काय म्हनून? देव कोपला की काय?
अहो देवाचा कोप काय घेऊन बसलात? ही तर माणसाचीच करणी. “धृ"
आता समदं नीट समजावून सांगा बाई.
ऐकाऽऽऽऽऽऽ...
अहो झाडं तोडलीत घरापासची,
रस्त्यातली, जंगलातली आणि डोंगराऽऽवरची...
त्याने जमिन रागावली... दूर पळू लागली.
पावसालाबी बरोबर घेऊऽऽन गेली
Chorus : असःऽऽऽऽ
खरच ग बया आताशा झाडझूडं जरा कमीच झाल्याती !!
हो की नाही??
झाडंपानं नाहीत तर गुरं कशी चरायची?
बीना सरपणाची चूल कशी पेटायची?
Chorus : खरंच ग बया..
"धृ"
आता आम्ही काय केलं?
अहो... खेडी जंगलं साफ झाली...
रस्ते पुलांची सोय झाली.
म्हणून शहरी मंडळी तिकडे
कारखाने बांधायऽऽऽला धावली...
पण त्याने गावाची प्रगतीच झाली न?
अहो पण त्यानेच या नष्टचर्याची सुरूवात झाली...
ती कशी काय?
सुधारणा, प्रगती म्हणजे काय झालं??
झाडे जंगले कापली,
काँक्रीटच्या जंगलात माणसं लपली
कारखाने वाढले, रहदारी ऽऽऽ वाढली...
Chorus : बरोबर
या सगळ्यासाठी ज्यादा वीज अन् पाणी
मिळवाया धावला मनुष्यऽऽप्राणी.
झाडे कमी झाली, पाण्याची पातळी खाऽऽली गेली...
हे प्रकरण जरा मोठच दिसतय
सगळच एकात एक गुंतलेलं दिसतय...
प्रकरण मोठे आहे जरा
पण वेळीच जागे होऊन काढा उतारा...
Chorus: काढा हो उतारा (3)
नीट लक्ष देऊन ऐका, मोठया घराची मोठी शान!!....
लाईट पंखे इस्त्री गीजर,
AC, TV, Freeze गीजर, 31UT Computer
या सगळ्याला जादा वीज हवी की नाही??
Chorus : हवी तर...
जोडीला हवी स्कूटर मोटर,
त्यांना पेट्रोल भाराभर..
Chorus : अगदीऽऽऽऽऽ बरोबर
ज्यादा वीज पेट्रोल पाणी ,
हीच तर आमची रहाणी!!
या सगळयाने काय झाले???
Chorus : काय झाले? काय झाले??
झाडांची संख्या रोडावली
पाण्याची पातळी खाली गेली
प्रदूषाणाची छाया सर्वत्रऽऽ पसरली.
Chorus : बरं...
निसर्गाने खूप दिले
आपणच नाही टिकवले... म्हणूनच..
"धृ"
तर... परिणाम आता स्पष्ट आहे.
Chorus : ...काय?
अन्नपाण्यावाचून पुढची पिढी
जरी तग धरेल थोडीतरी..
तरी प्रदूषित हवेपुढे कसे हो टिकावे??
बापरे, एवढी भयंकर परिस्थिती आहे??
बापरे, एवढी भयंकर परिस्थिती आहे?? भयंकर आहे पण अजूनही प्रयत्न करता येतील...
Chorus : ते कसे??
झाडे लावा घरीदारी
झाडे लावा घरीदारी वृक्षही जगवा आपल्या परी
त्याने मनुष्य पक्षी प्राणी, दुऽऽवा देतील
नुसती झाडं लावून सगळं ठीक होईल??
नीट ऐका...
झाड एक मुख्य दुवा..
निसर्ग आणि माणसातला...
म्हणून त्याचे अस्तित्व महत्वाचेऽऽ माना.
झाडे झुडपे वाचतील, जमिनीलाही वाचवतील
पाणी झिरपेल मातीत आणि पाऊसहीऽऽ येईल.
पाऊस येता भरपूर. पिक येईल महामूर
विजेचे उत्पादन ही चांगले होईल...
Chorus : चला..म्हणजे झाडे लावा आणि हवे तेवढेऽऽऽ वीज
पाणी वापरा...
वीज पाणी जरूर वापरा पण अनावश्यक वापर टाळा... नाहीतर...
“धु"
Chorus : बरं..
आपल्या मुलांच्या शिक्षणाची,
आजारपणाची, लग्नाची अन हौशिची
तरतूद करता ना पैशाची??
Chorus : हो तर...
तशीच तरतूद वीज पाण्याची आताऽऽ कराहो
नाहीतर.
"धु"
विजेला पर्याय उर्जा सोलर
दिवे कूकर heater आणि गिजर...
वापरावे नेमाने जरूर... Chorus : अगदी जरूर...
कचरा टाका योग्य ठिकाणी
वाचवा नदीचे पाणी