यावर्षी देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी झाली.या आयोजनामागाचे सूत्रधार खासदार छत्रपती संभाजी राजे शाहु होते.त्यांच्या या आयोजनात कुठलीही कमतरता भासू नये म्हणून राजे संयोगिता या त्यांच्या सोबत सावलीसारख्या होत्या. शिव जयंती सोहळा चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी दिल्लीतील छत्रपती संभाजी राजे शाहु यांच्या घरात सातत्याने लोकांचा राबता असायचा.या येणा-या लोकांना काही कमी पडू नये याची संपूर्ण जबाबदारी राजे संयोगीता यांनी या काळात घेतलीयाच वेळी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वेगळेपण दिसून आले. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी त्यांच्याशी भेट घेण्याचे निश्चित केले आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक-एक पैलु उलगडत गेले.
भारताने लोकशाही स्वीकार- ल्यामुळे राजेशाही आपोआप संपूष्टात आली. इंग्रजांच्या काळात काही संस्थानिकांनी इतिहासाला लाजविणारे धाडसी निर्णय घेतले, त्यामुळेच इतिहासात त्यांचे नाव आणि काम सुवर्ण अक्षरांनी लिहीले गेले आहे. 'शिवाजी महाराजा' सारख्या मोठया मनाचा राजा महाराष्ट्रात होऊन गेला. ज्याने जनतेवर निस्सिम प्रेम केले. त्यांच्या समस्यांना सदैव प्राधान्य दिले. म्हणूनच महाराष्ट्राचे दैवत म्हणून जसे शिवाजी महाराजांकडे बघितले जाते. तसेच त्यांचे वंशज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचेही योगदान मोठे आहे. त्यांनी आपल्या संस्थानिकामध्ये प्रस्थापित चुकीच्या रूढी परपंरा मोडून लोकोउपयोगी निर्णय घेतले.तोच वसा त्यांच्या कुटूबांतील सदस्यांनी आजही कायम ठेवल्याचा परिचय राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे शाहु तसेच त्यांच्या अर्धागिणी राजे संयोगीता यांना भेटल्यावर प्रखरतेने जाणवते.
राजे संयोगिता या शाहू महाराजांच्या वंशातील सुन असूनही वागण्या-बोलण्यात कोणताही बडेजाव दिसत नाही. उलट घरी काम करणा-या कामगाराला तेवढयाच प्रेमाने आप्तपणे विचारपुस करतात.
यावर्षी देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी झाली. या आयोजनामागाचे सूत्रधार खासदार छत्रपती संभाजी राजे शाहु होते. त्यांच्या या आयोजनात कुठलीही कमतरता भासू नये म्हणून राजे (राणी) संयोगिता या त्यांच्या सोबत सावलीसारख्या होत्या. शिव जयंती सोहळा चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी दिल्लीतील छत्रपती संभाजी राजे शाहु यांच्या घरात सातत्याने लोकांचा राबता असायचा.या येणा-या लोकांना काही कमी पडू नये याची संपूर्ण जबाबदारी राजे संयोगीता यांनी या काळात घेतली. याच वेळी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वेगळेपण दिसून आले.त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी त्यांच्याशी भेट घेण्याचे निश्चित केले आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक-एक पैलू उलगडत गेले.
संयोगिता राजे स्वभावाने अतिशय मनमिळावू आहेत. त्यांचे आईचे माहेर नागपूरला असल्यामुळे त्यांचा जन्म हा नागपूरचा आहे. बालपण हे छत्तीसगड येथे गेले. ग्वाहेरला ११ पर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे लग्न छत्रपती संभाजी राजे शाहु यांच्याशी झाले आणि त्या शिवाजी महाराजांच्या कुटूबांत सामील झाल्या.
निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड असल्यामुळे विशालगडाच्या पायथ्याशी त्यांनी १० हजारांची रोपवाटीका फुलवली. या रोपवाटिकेला त्यांनी 'शिवारण्य' असे नाव दिले.
छत्रपती संभाजी राजे शाहु महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यामधील 'येळवण जुगाई' हे गाव दत्तक घेतल.त्या गावाच्या विकासाची संपुर्ण जबाबदारी ही राजे संयोगिता यांनी उचलली. या दत्तक घेतलेल्या 'येळवण जुगाई' गावात ५९९ कुटूंबे आहेत. गाव मागासले असून येथे सुविधांचा अभाव होता. गावांच्या लोकांना सोबत घेऊन लोकजागृतीचे कार्यक्रम चालविण्याचे कार्य राजे संयोगिता करीत आहेत. गावात काय हव आहे यासाठी प्रश्नावली तयार करून ती स्थानिकांना वाटली. याचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला. या प्रश्नावलीमध्ये स्वच्छता, महिलांच्या समस्या, रोजगार निर्मिती अशा अनेक ग्रामस्थांना भेडसावणा-या समस्यांचा समावेश होता. आदर्श गाव योजनेतून गावाचे रूप पालटण्याचे स्वप्नाचा पाठलाग सुरू केला. केंद्र आणि राज्य शासनाचा योजनांचा लाभ गावक-यांना मिळावा यासाठी वारवार शासकीय अधिका-यांशी चर्चा केली.याचा परिणामही सकारात्मक झाला. गावक-यांना शासकीय योजनेचा लाभ मिळू लागला. गावात केलेल्या जनजागृती कार्यक्रमामुळे गावातील जंगलतोड कमी झाली, गावात करवंदाचे उत्पन्न वाढले. करवंदाची विक्री करून गावक-यांना नव्या उत्पन्नाचे साधन मिळाले. याबरोबराच अधीक वृक्ष लागवड केल्यामुळे राज्य शासनाचा वनश्रीचा प्रथम पुरस्कार येळवण-जुगाई या गावाला मिळाला. गावातील स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले. त्याचा परिणाम म्हणुन गावाला स्वच्छतेचा तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. गावात प्लास्टिकला पूर्णतः बंदी आहे. त्याचा पर्याय म्हणुन कापडी पिशवी वापरल्या जातात. यासह संयोगिता राजे यांनी स्वतः लक्ष देऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे गावक-यांना मिळावी यासाठी प्रयत्न केला. गावातील सर्वच कुंटूंबीयांकडे आधारकार्ड हवे यासाठी विशेष लक्ष दिले. आज सर्वाकडे आधारकार्ड आहे. गावातील शेतक-यांना जैविक-सेंद्रीय शेतीकडे वळविण्यात येत आहे. जमीनीची सुपीकता टिकून राहावी यासाठी आता गावकरी स्वतः प्रयत्नशील आहेत.
राजे संयोगिता इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी कोल्हापूर येथे त्यांच्या कुळदैवत असणा-या परिसरात प्लास्टिला बंदी केली. येथे देवीला चढविण्यात येणा-या साडीचोळीची पिशवी तयार करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. कोल्हापूरातील महिलांना मिळालेल्या स्थायी रोजगारा मुळे तीथल्या महिलाही आनंदी आहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण कामामुळे कोल्हापूरात संयोगिता राजेही आज स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. संयोगिता राजे यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण अंत्यत सकारात्मक असल्यामुळे आयुष्यात काही चांगले करण्याची संधी मिळाल्यास ती दवडू नये असे त्या मानतात.