'सत्य कथा '

आज सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात || दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरात प्रवेश करणार तोच नेहमी मंदिराच्या कोपयावर भीक मागणारी अंध म्हातारी दिसली. सुरकूतल्या चेह-याने व कृष हाताने ती मंदिराचा दरवाजा चाचपडत होती



भीक मागत ही म्हातारी आज थेट इथपर्यंत आली हा विचार करुन मी माझं पैश्याने भरलेलं पाकीट तिला भीक देण्यासाठी काढलं.


नोटांच्या कण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चिल्लरच्या कप्प्याकडे हात घातला.


'त्यातही हाताशी आलेल्या १० व ५ च्या नाण्याला सोडून सगळयात छोटं एक रुपयाचे नाणं काढलं आणि स्वतःला दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर (ज्यात अगोदरच काही नाणे होते) ते नाणं टेकवल.


म्हातारीने त्या नाण्याचा स्पर्श होताच 'सुखी रहाचा' भरभरुन आशीर्वाद दिला.


एक रुपयाच्या बदल्यात देवाच्या साक्षीने सकाळी सकाळी 'सुखी रहाचा' आशीर्वादाने मिळाल्याने मनोमन खुश होत मी शिव दर्शनासाठी पुढे सरसावलो... बघतो तर ती म्हातारीही पुढं होत होती.


मी म्हण्टलो दिले की आजीबाई पैसे अजून काय पाहिजे?


म्हातारी नाही रे तोच तर रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातून.


मी तिच्या उत्तराने थबकलो व माझा पूर्वीचा चेस्टेचा सूर बदलून तिला विचारले, मग काय आजी तुला दर्शन घ्यायचे आहे का!!


म्हातारी हसत हसत बोलली मला कुठे काही दिसत रे बाबा की आत जाज त्याच वेगळं दर्शन घ्यावं!!


तिच्या या उत्तराने आता मी पुरता भांबावलो, दरवाज्याकडे परत वळलो व काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, चल आज्जी तुला हात धरुन देवापाशी घेऊन चालतो.


म्हातारी तू चाललाय ना आत?


मी हो, का ग!


म्हातारी मग माझं येक काम करशील पोरा!


मी (सांशक होत) बोल काय काम. म्हातारीने तिचा हात पुढे केला आणि बोलली येवढं देवाला देशील!


आणि तिने हाताची मुठ हळुवार उघडली, त्यात १०, ५, २, १ चे नाणे होते.


मी हे देवाला द्यायचे! (तिची परिस्थिती बघून मी बोललो)


म्हातारीरू हो.


मी देवाला काय करायचे तुझे पैसे!


म्हातारी अरे तोच तर मला देतो, मग मी नको त्याला काही द्यायला?


मी अग पण देवाला नाई लागत पैसे, तो काय करेल याच, उलटे हे तुझ्याच कामात येतील की.


 म्हातारी माया पुरते तर तो रोज देतोच की, हे त्याच्यासाठीचे आहे त्याच्या पैश्याच काय करायचं हे त्याच तो जाणे, तू टाक हे


पेटीत जा...


तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली एवढं बोलून ती अंध म्हातारी तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली देखील, निष्कामपणे देवाकडे काहीही न मागता, देवाची झोळी भरुन...


मी म्हातारीच्या ख-या औदर्याने भारावलेल्या अवस्थेत नकळत त्र्यंबकेश्वरापुढे उभा ठाकलो.


म्हातारीने हातात टेकवले सर्व नाणे दानपेटीत रीते केले आणि रीत्या मनाने व रीकाम्या हाताने मंदिराला प्रदक्षणा मारुन घराकडे परत निघालो...


परततांना पुढे मंदिराच्या कोप-यावर तीच अंध म्हातारी तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली दिसली.अगदी प्रसन्न...


स्वतःशी हसत, काही तरी बडबडतांना...


(ती हातात नुकत्याच कुणीतरी दिलेल्या ५० च्या नोटेला चाचपडत, हसत काहीतरी पुटपुटत होती...)


कुतूहलापोटी मी ती काय पुटपुटतेय हे ऐकण्याचा प्रयत्न केला...


म्हातारी देवा तुला बी जरा दम नाही बाबा, लगेच पैसे परत  पाठवले बी, मला काय करायचे रोज येवडे...


थोड्यावेळापूर्वी एक रुपयाच नाणं टेकवणार व्यवहारी मी परत एकदा निशब्द झालो, एकदम हरवलेला.. कधी त्या म्हातारीकडे बघत होतो तर कधी दूर गाभा-यात बसलेल्या, न दिसणा-या त्या देवाकडे....


कळतच नव्हत कोण मोठं?


रोज न चुकता या दीन दुबळयांची काळजी वाहणारा तो परमपिता परमेश्वर की श्रद्धा व विश्वासाने त्या देवाचीही झोळी भरणारी ती अंध म्हातारी...!!!